news-details
तंत्रज्ञान

शनिवार-रविवारी केवळ विद्युत बस धावणार

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने विद्युत बसगाडय़ांचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने एनएमएमटीने आठवडय़ाअखेरीस शनिवारी आणि रविवारी शून्य इंधन दिवस ठरविले आहेत. या दोन दिवसांत केवळ विद्युत बस सेवेत ठेवून, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक शहर ठेवण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एनएमएमटीने दिली आहे.   

दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोलचे वाढते दर यामुळे नवी मुंबई परिवहनाचे चाक आणखी तोटय़ात गेले आहे. त्यामुळे एनएमएमटीने आता तोटा कमी करण्यासाठी इतर उत्पन्न यावर लक्ष केंद्रित

केले असून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बस सेवेत घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार परिवहनाच्या ताफ्यात आता १५० विद्युत बस रस्त्यावर धावत आहेत. यामुळे सध्या १५० बसच्या इंधनाचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे आणखी इंधन वापर कमी करून इंधन बचत आणि खर्च कमी करण्यासाठी शून्य इंधन दिवस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेने सप्ताहअखेरीस एकही इंधन बस न वापरण्याचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी ही करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments