news-details
तंत्रज्ञान

चिखलीच्या जनसेविका सौ. शितलताई जितेंद्र यादव सकाळ वृत्तसमुहाच्या “Idols of Maharashtra 2022” या पुरस्काराने सन्मानित.

चिखली : परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असणारे चिखली गावाचे युवा नेते श्री जितेंद्र यादव व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत समाज कार्य करणाऱ्या सौ. शीतल ताई यादव यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत सकाळ समूहाने त्यांचा Idols of Maharashtra 2022” या पुरस्कार देऊन सन्मान केला. यादव कुटुंब हे गेली अनेक वर्ष चिखली गावात व आजूबाजूच्या परिसरात सामाजिक कार्य करत आहे. हेच कार्य करत असताना त्यांनी “सर्व धर्मीय मोफत विवाह सोहळा" या अंतर्गत गरजु मुला-मुलींचे आत्तापर्यंत २६ मोफत विवाह करुन दिले. दरवर्षी कमीत कमी १०० विवाह लावून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. श्री. जितेंद्र यादव यांच्या आई स्व.सौ. अलकाताई यादव यांनी चिखली परिसरात अनेकांच्या कुटुंबातील समस्या सोडवन्याचा प्रयत्न केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन हे दांपत्य अनेकांच्या कुटुंबातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. याचीच दखल घेत सकाळ वृत्तवाहिनीने सौ.शितलताई जितेंद्र यादव यांना " Idols of Maharashtra 2022" पुरस्काराने सन्मानित केले. "या पुरस्काराने समाजाप्रती काम करण्याची इच्छा अधीक बळकट होईल." असे शीतलताई पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments