news-details
शिक्षण

NEET PG 2024 Exam Date: 3 मार्च नाही, 7 जुलैला 'नीट पीजी'ची परीक्षा

NEET PG परीक्षेची (NEET PG 2024) तारीख समोर आली आहे. नीट पीजी परीक्षा 3 मार्च 2024 रोजी होणार नसून आता 7 जुलै 2024 रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (National Board of Examinations in Medical Sciences) ही माहिती दिली आहे. या संदर्भात अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेत नव्या परीक्षेच्या तारखेबाबत सांगितलं आहे. यापूर्वी परीक्षेची तात्पुरती तारीख जाहीर करण्यात आली होती. तात्पुरत्या तारखेनुसार, 3 मार्च 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, आता परीक्षा 7 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसेच, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं परीक्षेची ही तारीखही तात्पुरती असून या तारखेतही बदल होऊ शकतो, असं स्पष्ट केलं आहे. 

भारतातील सर्व वैद्यकीय संस्थांसाठी औषधाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामान्य समुपदेशन केवळ संबंधित परीक्षांच्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. सर्व जागांसाठी समुपदेशनाच्या सर्व फेऱ्या राज्य किंवा केंद्रीय समुपदेशन प्राधिकरणाद्वारे ऑनलाइन केल्या जातील आणि कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देणार नाही. सीट मॅट्रिक्समध्ये तपशील भरताना, वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी शुल्काची रक्कम नमूद करणं आवश्यक आहे, असं न केल्यास जागा मोजली जाणार नाही. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments