देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी देखील हा टप्पा गाठणारा हा देशातील पहिला स्टॉक होता. MRF ही देशातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे आणि जगातील टॉप 20 टायर कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो.
एमआरएफ कंपनी बाईकपासून ते फायटर प्लेनपर्यंत सर्वांसाठी टायर बनवते. आज जरी ती टायर बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जात असली तरी एकेकाळी ती लहान मुलांसाठी फुगे बनवायची. या कंपनीचं पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. आज या कंपनीचे मार्केट कॅप 57,242.47 कोटी रुपये आहे.
0 Comments