news-details
आरोग्य

हिवाळ्यात दही, ताक पिणे फायदेशीर आहे की नाही?

ऋतुमानानुसार आपल्या आहारात  बदल होत जातात. आता सगळीकडे थंडीचे गार वारे वाहतायत, त्यामुळे शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी ‌आपण गरम पदार्थांचे सेवन करतो. पण, काही थंड पदार्थ असे असतात जे वर्षाचे बाराही महिने आपल्याला खायला आवडतात. पण, असे पदार्थ आपण थंडीत खाऊ शकत नाहीत. हे पदार्थ नेमके कोणते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तहान लागत नाही, त्यामुळे आपसूकच पाण्याचं सेवन कमी केलं जातं. जे आरोग्यासाठी घातक ठरतं. शरीरात पाण्याच्या अभावामुळे डिहायड्रेशन होते. हे डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपण या थंड पदार्थांचे सेवन करू शकतो, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊबही मिळते. तर थंडीमध्ये 'हे' थंड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ते पाहूयात. 

ताक 

ताक प्यायल्याने पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. हिवाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात जर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका.

 आईस्क्रीम

आईस्क्रीमचा गारेगारपणा आपल्याला हिवाळ्यातही हवाहवासा वाटतो. पण, हिवाळ्यात आईस्क्रीम खाताना आपण कचरतो. हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने तणाव कमी होतो. 'आईस्क्रीम'मध्ये व्हिटॅमिन डी आढळते जे शरीरासाठी गरजेचं आहे. पण आईस्क्रीम खाताना स्वत:चं आरोग्य आणि प्रकृती पाहून खावं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments