news-details
राजकारण

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली, शरद पवारांचा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी:

 यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांनी टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली, अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली आहे. तीस हजाराचा घरकुल प्रोजेक्ट आडम यांच्या मेहनतीचे  फळ आहे, असेही मोदी  म्हणाले.  ते सोलापुरात बोलत होते.

ईडीचा हत्यार म्हणून वापर करण्यात येत आहे : शरद पवार

ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या नोटसीवर बोलतनात रोहित पवार म्हणाले, ईडीचा हत्यार म्हणून वापर करण्यात येत आहे. संजय राऊत, अनेक देशमुख  यांना ही एडीची नोटीस आली आली आहे.अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिले आहे. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस झाली होती . रोहित पवार यांना नोटीस आली असेल चिंता करायची कारण नाही. नरसिंहराव, मनमोहन सिंग यांच्या काळात असे चित्र नव्हते.

प्रकाश आबेडकरांबाबत आमचा विचार पक्का : शरद पवार

इंडिया आघाडीवर बोलताना शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीत जयंत पाटील आणि  जितेंद्र आव्हाड आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही बोलणे झाले. त्यांना सोबत घेण्याचा विचार आम्ही करत आहोत. आंबेडकरांबाबत  आमचा पक्का विचार आहे.

जरांगे पाटलांनी निवडणूक लढवणे हा त्यांचा निर्णय : शरद पवार

मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जरांगे पाटील यांनी लोकसभा लढावी या संदर्भात हा त्यांचा प्रश्न आहे. जरांगेना राज्य सरकारने काय आश्वासन दिले असेल ती पाळली नसावी.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"माझी आनंद वाढणार की नाही. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं.", असं मोदी म्हणाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments