news-details
राजकारण

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे. 

मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूर मध्ये बोलतानाते म्हणाले की सरकारच्या निर्णयाने मराठा समाजाच्या समाधान केले जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई कडे चालत जाऊ नये, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी चालत जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. 

मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार

दुसरीकडे, मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार आहेत. याबाबत बोलताना म्हणाले की, राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आव्हान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ स्वच्छता करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मनाप आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राम मंदिर व्हावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिर तयार झाले मी राम, राम माझा ही भावना सगळ्यांची आहे. कागलमध्ये एक लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments