news-details
राजकारण

मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज तिसरा दिवस; असा असणार दिवसभराचा 'दिनक्रम'

: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी दिंडीचा आजचा तिसर दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी (करंजी घाट) येथे पोहचले. रात्रीचा मुक्काम करून जरांगे हे आज सकाळी पुन्हा मुंबईकडे कूच करणार आहे. आज दिवसभराचा बाराबाभळी ते रांजणगांव असा प्रवास असणार आहे. बाराबाभळीमधून सकाळी 9 वाजता जरांगे निघणार असून, सुपा येथे दुपारच भोजन करणार आहे. तसेच रांजणगाव (गणपती) येथे आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. 

आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, आणि हीच सरकारची अडचण आहे. 60 ते 70 वर्षांचा आमचा लढा आहे, मात्र तरीही आम्हाला आरक्षण दिले नाही. मुख्यमंत्री यांच्यामुळे आतापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिला, परंतु आता मुंबईत जाणारच आणि आरक्षण मिळवणारच या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झाडल्या तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. मी असेल नसेल सरकारने काही षडयंत्र रचल्यास हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा, असे जरांगे म्हणाले. 

राम उत्साह साजरा करणार...

आज देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) साजरा केला जात आहे. दरम्यान, आम्ही देखील या उत्साहात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हाला देखील याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असल्याचेजरांगे म्हणाले. 

 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments