सध्या पौष महिना सुरु असून, पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त आहेत. यामुळे चांदी आणि सोन्या साठी मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तर मागणीही वाढताना दिसत आहे. अशातच तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर ही बातम तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ, तुमच्या शहरातील आजचा भाव काय, हे जाणून घ्या. आज मात्र सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहेत. आज 21 जानेवारीला सोन्याच्या दरात (Gold Price Today) कोणताही बदल झालेला नाही. शनिवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नसून चांदीचा भाव स्थिर आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,500 रुपये प्रति किलो आहे. मात्र, शनिवारी एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये होता. त्यानंतर रविवारी चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आणि आज भाव स्थिर आहे.
पुणे- आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम
0 Comments