news-details
देश-विदेश

अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान; उद्धव ठाकरे म्हणाले, आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!

आज अखेर बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray)  स्वप्न पूर्ण झालं. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया  प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर दिली आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे निमंत्रण मिळाले. मात्र उद्धव ठाकरे आज नाशिक मधील काळाराम मंदिरात श्रीरामाचे पूजन करणार आहेत.

भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा

 अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा अखेर संपली... अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. हिंदू संस्कृतीनुसार सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन... या तिन्ही देवतांना विनंती करत, अग्नि यज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. प्रभाते मनी राम चिंतीत जावा।, पुढे वैखरी राम आधी वदावा॥ श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाची खरीखुरी सात्विक  प्रचिती सध्या अखंड भारत भूमी घेत आहे

 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments