news-details
Sports

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमधून

टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्यानंतर भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. त्यापाठोपाठ लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल  जिंकणारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) पहिली मॅच जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments