news-details
आरोग्य

कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत परिसरामध्ये एक दिवसीय लसीकरणाचे आयोजन, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय युवक कल्याण व्यायाम केंद्र च्या व  श्रमिक फाउंडेशन च्या प्रयत्नाने कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत परिसरामध्ये काल एक दिवसीय लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष वरक म्हणाले की वडार वस्ती परिसरात कोरोना काळात विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. अंदाजे ४००० हजार नागरिकांची लोकवस्ती  असल्यामुळे  ह्या परिसरात अशिक्षित व वृद्ध नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्यास नागरिकांना मोठ्या अडचणी भेडसावत होत्या, त्यामुळे या भागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय युवक कल्याण  व्यायाम केंद्र च्या श्रमिक फाउंडेशन च्या प्रयत्नाने कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत परिसरात लसीकरण घेतले होते. या लसीकरण मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील नागरिकांनी हे शिबीर किमान ३ दिवस सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments