पुणे: वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
0 Comments