टिपू सुलतान नावावरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”
योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. टिपू सुलतानच्या नावाला भाजपासह बजरंग दलाने विरोध केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या क्रीडा संकुलासमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
0 Comments