news-details
General

गडचिरोलीत भीषण अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गुरूवारी सकाळी अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला जात होते. दरम्यान , ट्रॅक्टरने कारला समोरासमोर दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रासप नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे जखमी झाले आहेत. हा अपघात आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला. आनंद गण्यारपवार यांच्या निधनामुळे चामोर्शीमध्ये शोककळा पसरली आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments