news-details
व्यापार

राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी : नवाब मलिक

मुंबई : राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. काल  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली . 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments