पुणे : राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. यातच येत्या २४ तासात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे हवेत गारवा पसरून महाराष्ट्रासह इतर काही राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात अनेक भागात कमी तापमान नोंदले असून मध्य महाराष्ट्रात धुळे , नंदुरबार, जळगाव ,पुणे,अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद,बीड, परभणी,जालना इथे थंडीची लाट होती.
0 Comments