news-details
General

धक्कादायक : २०१९ -२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत ८८० अपात्र उमेदवारांना खंडणी घेऊन पात्र ठरविल्याचा प्रकार उघडकीस

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या प्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह इतर आरोपींचा तपास करण्यात येत होता. तपासात उमेदवारांच्या ‘ओएमआर शीट’ची पडताळणी करण्यात आली, तेव्हा राज्यातील सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. अपात्र उमेदवारांची गुणवाढ करण्यात अशा उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. अपात्रांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेण्यात आले. अपात्रांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. सुपे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments