news-details
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पुणे : आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीकडून एकत्रित लढविली जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर होताच स्वबळाचा नारा दिला आहे. प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल झाली आहे, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी आम्ही स्वबळावर लढू अशी जाहीर घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली स्वबळाची भाषा जागा वाटपात मित्रपक्षांवर दबाव टाकण्यासाठी असल्याचीही चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागांची प्रारूप रचना मंगळवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करतानाच त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे स्पष्ट केले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments