Latest News

news
लाईफ स्टाईल

भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती

मागील काही दिवसांपासून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचा प्रसाद ऑनलाईन थेट घरापर्यंत पोहोचणार, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे भक्तवर्गात मोठा आनंद देखील पाहायला मिळत आहे. पण, आता भक्तांच्या याच आनंदावर विरजन पडतंय. राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टने या ऑनलाईन प्रसादाबद्दल मोठा खुलासा केलाय.  श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र (Ayodhya)  ट्रस्टने ऑनलाईन...


news
व्यापार

MRF कंपनीच्या शेअरची किंमत 1.50 लाखांवर

देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती....


news
आरोग्य

पुण्यात हुडहुडी! हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक...


news
मनोरंजन

22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार  (Pune international film festival)आहे. या महोत्सवाचं  (पीफ) उद्घाटन 18 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे, असं महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.  गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या...


news
राजकारण

राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती; रत्नागिरीतल्या निवासस्थानी चौकशी

 ठाकरे गटाचे  आमदार साजन साळवी  यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले आहेत.  ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "मी सर्व...


news
देश-विदेश

इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला

इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या...


news
शिक्षण

NEET PG 2024 Exam Date: 3 मार्च नाही, 7 जुलैला 'नीट पीजी'ची परीक्षा

NEET PG परीक्षेची (NEET PG 2024) तारीख समोर आली आहे. नीट पीजी परीक्षा 3 मार्च 2024 रोजी होणार नसून आता 7 जुलै 2024 रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (National Board of Examinations in Medical Sciences) ही माहिती दिली आहे. या संदर्भात अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेत नव्या परीक्षेच्या तारखेबाबत सांगितलं आहे. यापूर्वी...


news
क्रीडा

IND vs AFG 3rd T20I Match: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा शेवटचा टी20 सामना आज

टीम इंडिया  आणि अफगाणिस्तान  यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील  शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर  खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ  याच वर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप खेळणार आहे....


news
इतर

आज रामललाचा मंदिरात प्रवेश, उद्या गर्भगृहात विधीवत पूजन

आज रामललाची मूर्ती राम मंदिरात प्रवेश करणार आहे. आजपासून मूर्तीच्या पूजाविधीला सुरुवात होईल. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत असून वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे....


news
राजकारण

आमदार अपात्रता निकालाविरोधातील उच्च न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण, सर्व प्रतिवाद्यांना नोटीस

शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात: मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांविरोधात...