news-details
मनोरंजन

22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार  (Pune international film festival)आहे. या महोत्सवाचं  (पीफ) उद्घाटन 18 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे, असं महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. 

गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. सदाबहार अभिनेते देव आनंद (26 सप्टेंबर 1923 ), गायक मुकेश (22 जुलै 1923), दिग्दर्शक मृणाल सेन (14 मे 1923), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (28मे 1923), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी (19नोव्हेंबर 1923) आणि गीतकार शैलेन्द्र (30ऑगस्ट 1923) यांचे जन्मशताब्दी वर्ष ‘पिफ’ साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे सचिव विकास खार्गे, ‘फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, विविध देशांचे कॉन्सूल जनरल आणि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीं उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे डॉ, जब्बार पटेल यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे. 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments