वाई : हभप बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातारा जिल्ह्याचे राजकारण दोन दिवस ढवळून निघाले. बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी या वादात भाजपने पद्धतशीरपणे राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केलाच. साताऱ्यात हभप बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. या वेळी बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा मुलगा आदींच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली. हभप बंडातात्या कराडकर हे ज्येष्ठ कीर्तन व प्रबोधनकार आहेत. समाजप्रबोधनाचं मोठे काम ते सगळय़ा स्तरात करतात. राज्यसत्ते सोबतही त्यांचा लढा सुरू असतो. डाऊ कंपनीविरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं.
0 Comments