पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपण या प्रकरणाविषयी केंद्र सरकारकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे. तसंच पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे की, "रुपाली ताई चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी वाईन विक्रीला आपले समर्थन दिले आहे. मी चाकणकर यांना ओळखतो. त्यांचे भाऊ भाजपचे काम करतात. आपण त्यांची भेटही घेतली आहे. अतिशय सुसंस्कृत घर आहे. आता मी त्या घरामध्ये जाऊन त्यांना विचारतो की, तुम्हाला वाईन चालणार आहे काय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाईन विक्रीवर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आहे. त्यावरुन अनेक राजकीय नेत्यांनी परखड प्रतिक्रियाही दिल्या आहेत."
0 Comments