भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ ला पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचाराचा प्रकार घडला होता त्याच्या चौकशीसाठी शरद पवारांचा आपला जबाब नोंदवणार आहे. तसेच यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
यापूर्वी त्यांना जुलै महिन्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते आता पुन्हा २३ फेब्रुवारीला त्यांना साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
0 Comments