news-details
राजकारण

पंकज कुमावत यांच्या जाळ्यात अडकला खंडणी बहाद्दर

दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाला खंडणी मागणाऱ्याला पाच हजार रु. स्विकारताना ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे केज तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ७ फेब्रुवारी रोजी दै. पार्श्वभूमी या दैनिकात "केज मध्ये बनावट खव्याचे रॅकेट पुन्हा सक्रिय ; दूध विरहित तयार झालेला खवा जातो राज्यभर : अन्न औषध प्रशासनासह पोलीसांनी घेतले झोपेचे सोंग " अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने शेख वाजेद यांनी विशाल डेअरी फार्मचे मालक विशाल चौरे यांना त्यांच्या डेअरीची बातमी प्रसिद्ध न करता बदनामी थांबवायची असेल व व्यवसाय सुरळीत चालवायचा असेल आणि त्यांच्या डेअरी व्यायासायाच्या अशा बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी त्यांना एक लाख रु. ची मागणी केली.

त्या पैकी अर्धी रक्कम आता द्या आणि उर्वरित नंतर द्या. अन्यथा त्यांच्या ग्रुपच्या सर्व वर्तमानपत्र आणि प्रसिद्धी माध्यमातून तुमची बदनामी करू अशी धमकी दिली. विशाल चौरे यांना पैसे देण्याची ईच्छा नव्हती म्हणून त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना ही सर्व माहिती दिली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments