शुक्रवारी दि. ४/३/२०२२ रोजी काकडे पॅलेस,कर्वेनगर, पुणे येथे साहित्यसंपदा आयोजित कवयित्री सौ.निशा सुरेश शिंदे-खरात यांच्या 'काव्यनिश' या चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन करताना यशवंत देव म्हणाले आज मला या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आपण बोलावले याबद्दल सर्व प्रथमतः आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी एक कवी असून माझ्या हस्ते या काव्य संग्रहाचे अनावर केल्यामुळे मी भारावून गेलो असून आजची युवा पिढी कम्प्युटर च्या काळात कवितांना देखील इतकं महत्व देत असून ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुलभाताई तेरणीकर बोलताना म्हणाल्या की मूळ वैद्यकीय पेशा असणाऱ्या परिचारिका सौ.सुरेश शिंदे-खरात यांनी स्वतःमध्ये आवड निर्माण करून आज स्वतःचा कवी चारोळी संग्रह प्रकाशित केला असून, भविष्यातल्या संग्रहसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इतिहास संशोधक राहुल गोरे यांनी कवीभूषण यांची
कवने सादर केले. यावेळी बाल अभिनेता श्रीयश राजेंद्र खेडेकर, नगरसेविका सौ.वृषालीताई चौधरी, विकास माने, अशोक कदम, धनगर समाजाचे अध्यक्ष श्री भगवान शिंदे, शिवाजी शेळके, बाबूराव खरात, अनिल खरात, विठ्ठल खरात, अनिल खरात, संजय शिंदे, विकास माने, सुनील धनगर, वैष्णवी शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्रमिक फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष जनार्दन वरक यांनी केले यावेळी आभार मानताना संतोष वरक म्हणाले की यापुढे देखील काव्य रसिकांसाठी श्रमिक फाउंडेशन च्या वतीने अश्याच कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
0 Comments