युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारल्यापासून रशियाला (Russia) अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून कठोर निर्बंधांचा (US Sanctions) सामना करावा लागत आहे. स्विफ्टमधून (SWIFT) हद्दपार केल्यानंतर आणि अनेक बँकांवर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकेने रशियन तेल आणि गॅसवर (Russian Oil & Gas) बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर रशियाने सोमवारी तिखट प्रतिक्रिया देत युरोपला होणारा गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी दिली.
रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक (Alexander Novak) यांनी सरकारी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'हे पूर्णपणे स्पष्ट आहे की जर रशियन तेल नाकारले गेले तर त्याचे जागतिक बाजारावर गंभीर परिणाम होतील. कच्च्या तेलाच्या किमतीत एवढी वाढ होईल, ज्याचा अंदाज लावला येणार नाही. जास्त वाढले नाही तरी ते प्रति बॅरल 300 डॉलर इतका असेल.
0 Comments