दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री |
धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे यासाठी मुस्लिम उंन्नती सेवा फौंडेशन धुळे मालेगाव यांच्या वतीने 13 मार्च 2022 रविवारी धुळे लोकसभा मधील मालेगाव शहरातील रहेमताबाद 60 फुटी रोड येथे नशा मुक्त शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव शहराच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती लता दोंदे मॅडम, दिया आय केअर हॉस्पिटल चे अभिजित पवार, डॉ. शाह, डॉ. खुराणा तसेच या शिबरासाठी ज्यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले ते औरंगाबाद येथील नशा मुक्त चे एम डी डॉक्टर शेख फसीहुद्दीन व त्यांचे सहकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.
या शिबिरात धुळे व मालेगाव मधील मिळून 250 नशा करणाऱ्या रुग्णांची तपासणी करून प्रथमउपचार करण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले की नशा केल्याने कॅन्सर, लिव्हर असे अनेक आजार होतात व यामुळे माणसाला आपले जीव गमवावे लागतात.
मालेगाव शहरात अनेक कार्यक्रम आज पर्यंत घेण्यात आले परन्तु नशा मुक्त शिबीर हे प्रथमच आयोजन करण्यात आले आणि हे काम नक्कीच अभिनंदनाला पात्र आहे असे मत मालेगाव शहरांच्या पोलीस उपअधीक्षक श्रमती लता दोंदे मॅडम यांनी केले. मुस्लिम उंन्नती सेवा फौंडेशन धुळे मालेगावच्या टीम च्या वतीने आयोजित ह्या नशा मुक्त शिबीराला यशस्वी करण्यासाठी फौंडेशन चे अध्यक्ष शेख अफरोज, उपाध्यक्ष खालिद एस के, सचिव अकबर खान, सह सचिव आरिफ खान, खजिनदार शेख सलीम, सह खजिनदार अहेमद शेख, प्रसिद्धी प्रमुख राशीद शेख, वरिष्ठ सल्लागार शाबान दादा तांबोळी आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला आहे.
0 Comments