कुशल बद्रिकेने त्याची पत्नी सुनयनासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेची पोस्ट
“खरंतर तू दिल्लीला जाऊन “कथक केंद्रात” शिकावस, हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं…… ते राहीलच! पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस. खरच तुझा खूप अभिमान वाटतो. आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खर.”
“ही संधी तुला देणार्यांचे मनःपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट सांगेन, जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…..”, असे कुशलने म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
0 Comments