अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर परिसरात राहणारा अविनाश पाटील (२६) धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या लहान भावासोबत शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या समोर निर्माणाधिन असलेल्या इमारतीखाली उभे होते. त्याचवेळी अविनाश पाटील याचे काही मित्र त्याला रंग लावण्यासाठी आले. मात्र रंग लावण्याच्या भीतीने अविनाश आणि त्याचा भाऊ समोरील इमारतीत लपण्यासाठी पळाले. अविनाशचा लहान भाऊ हा पहिल्या मजल्यावर जाऊन थांबला. मात्र अविनाश आणखी वर गेला. मित्रांनी अविनाशच्या भावाला रंग लावून इमारतीखाली आणले. त्याचवेळी काहीतरी पडण्याचा आवाज आला. इमारतीच्या गच्चीवरून अविनाश पाटील जमिनीवर पडल्याचा जोरदार आवाज आल्याचे अविनाशच्या भावाने सांगितल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र अविनाशचा तोल कसा गेला? यावेळी गच्चीवर आणखी कोणी होते का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
0 Comments