लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उच्चपदस्थ नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या एका भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही यावेळी हजर होते. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शपथविधी समारंभाला हजेरी लावली. ५० हजार लोक बसू शकण्याची व्यवस्था असलेल्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये शपथविधी समारंभ पार पडला. सुरेश खन्ना, सूर्यप्रताप साही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य आणि आधी सनदी अधिकारी असलेले व नंतर राजकारणात आलेले ए.के. शर्मा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
0 Comments