news-details
राजकारण

सर्वपक्षीय आमदारांना शरद पवारांच्या घरी मेजवानी! दिल्लीतल्या निवासस्थानी सहभोजनाचं आयोजन

केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्रातले अनेक आमदार काल रात्री जेवणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जमले होते. त्या आधी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी चहापानाचा आस्वाद घेतला.


संसदेत सर्व पक्षांचे आमदार प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जमले होते. त्यानिमित्ताने शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना रात्री आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन संसदेतर्फे करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असलेले महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांना लोकसभेच्या सचिवालयाने पाच आणि सहा एप्रिल रोजी होणाऱ्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमासाठी दिल्लीला बोलावले आहे. हेच निमित्त साधून आम्हीही सहभोजन आयोजित केलं आहे. या दोन्ही भेटी केवळ सदिच्छा भेटी असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments