राज्यात सुरु असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला आता उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आल्याच्या मुद्द्याच्या फोडणी मिळालीय. ११ हजार भोंगे काढण्याबरोबरच उत्तर प्रदेशात ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलंय. मात्र उत्तर प्रदेशमधील या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष दिसून येण्यास सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील भोंगा हटवा मोहिमेनंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. मात्र या टीकेननंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करत निशाणा साधलाय. मात्र आव्हाड यांनी केलेली टीका नेमकी राज ठाकरेंसाठी आहे की अमृता फडणवीसांसाठी हे गुलदस्त्यातच आहे.
0 Comments