news-details
राजकारण

राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज यांचे मूळ दुखणे हे …”

राज यांच्या भाषणावर पहिली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर काही ट्विट्स केले असून यामधून त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. “राज ठाकरेंचे मूळ दुखणे हे आपला भाऊ मुख्यमंत्री व पुतणे मंत्री झाल्याचे असून, वरून ते पवार साहेबांमुळे (शरद पवारांमुळे) झाले याचे दुःख अजूनचं जास्त आहे. भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे,” असा टोला वरपे यांनी लगावला आहे. अन्य एका ट्विटमध्ये वरपे यांनी, “राज ठाकरे एवढे बेबींच्या देठापासून मोदी सरकारमुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था यावर बोलले असते तर थोडंफार पक्षाकडे मतदान तरी वळले असते. यावरून सुपारी कोणाची आहे हे कळतंय,” असंही म्हटलंय.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments