news-details
राजकारण

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी)-आपण या  समाजाचे देणं लागतो याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकट काळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना शासकीय - निमशासकीय समितीवर नियुक्त करण्याची मागणी केली असून याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करून पत्रकारांना संधी देऊ  तर मंडळाच्या बैठकीत देखील हा विषय घेऊन राज्यभरातील पत्रकारांना विविध समित्यांवर घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे  आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन  जळगाव येथे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.


वृत्तपत्र क्षेत्रात स्थिरता हवी असल्यास वृत्तपत्रांची किंमत वाढवावी लागेल - प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

कोरोना नंतरच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून कोरोनाचा सर्वाधिक फटका हा वृत्तपत्र क्षेत्राला बसला असून वृत्तपत्र क्षेत्रातील अस्थिरता थांबवायची असल्यास वृत्तपत्रांची किंमत वाढवावी लागेल आणि वाचकांना देखील तशी मानसिकता तयार करावी लागेल असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यावेळी म्हणाले........तर पत्रकार हा देखील एक समाजसेवक आहे त्याच्या कुटुंबाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे....  विश्वास  आरोटे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी बोलताना सांगितले की राज्य मराठी  पत्रकार संघाच्या माध्यमातून गोवा दिल्ली बेळगाव गुजरात महाराष्ट्र राज्यात संघटनेने पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे कोरोना काळामध्ये अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला त्या वेळी पत्रकार यांना अर्थसहाय्य देण्याचे काम राज्य पत्रकार संघाने केले याच बरोबर राज्य सरकारने पत्रकारांना 50 लक्ष रुपयांचा विमा कवच दिले जाईल असा शब्द दिला मात्र आदेश राज्य सरकारने काढला नाही  नाही कोरोणा काळामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील गोरगरीब नागरिकांना सुमारे दीड कोटी रुपयांचे किराणा धान्य व इतर साहित्य वितरण करण्यात आली तर अतिवृष्टीमुळे महाड चीपळून रत्नागिरी ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि झाली या ठिकाणी सहा ट्रक साहित्य राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली संघटना ही आपली मातृसंस्था असून या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या सुख दुःख या दोन घटना राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून नेहमी आपल्या पाठीशी आहे राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रत्येकाला सुखात दुखात उभी राहणारी ही मातृसंस्था नेहमीच आपल्या बरोबर राहील राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी विविध विभागीय स्तरीय अधिवेशन घेऊन विविध ठराव केले जातात पत्रकार संरक्षण कायदा यासारखे ज्येष्ठ पत्रकार सन्मान. योजना यामध्ये अनेक किचकट अटी असल्यामुळे आणि त्यांना याचा फायदा होत नाही त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन राज्य संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंत  मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्य पत्रकार संघ पत्रकारांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे मत विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले
मुकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरणदिल्ली येथील सबला न्यूज संपादिका सरला चौधरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलीक वाळेकर.जिवन गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील प्रकाश खंडागळे .

जेष्ठ पत्रकार कैलास शिंदे यांना मुकनायक पुरस्कार तर जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले, आल्हाद जोशी, हेमंत काळुंखे, प्रकाश खंडागळे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 


पत्रकारांना 2 लाखाच्या अपघात विमा वितरित

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा दोन लाख रुपयाचा अपघात विमा काढण्यात येत असून आज अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आठ पत्रकारांना  प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे(राजुमामा),महापौर सौ. जयश्री महाजन,माजी मंत्री गुलाबराव देवकर,  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे ,मनोकल्पचे संचालक मनोज वाणी, मंगळग्रह संस्थांनाचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हस्ते विमा वितरित करण्यात आला.


यावेळी पत्रकार संघांचे राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, मराठा वाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर संजय फुलसुंदर  उपमाहापौर कुलभूषण पाटील शालिग्राम गायकवाड, मुकुंद नन्नावरे, प्रविण सपकाळे, किशोर रायसाकडा,प्रमोद सोनवणे, मिलिंद लोखंडे,जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, जगदीश सोनवणे, प्रदिप गायके, दीपक सपकाळे, शरद कुलकर्णी,भूषण महाजन,नजनीन शेख, भगवान मराठे, संजय चौधरी,कमलेश देवरे,विलास ताठे, भानुदास चव्हाण,विजय गाढे,महेंद्र सूर्यवंशी, गोपाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयाज मोहसीन यांनी केले.

पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आर.एल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यासाठी हॉस्पिटल चे संचालक श्री.राजऐश्वर्य जैन यांच्या मार्गदर्शनाखाली  हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी  वर्गाचे सहकार्य लाभले. तर रेड प्लस रक्त पेढीच्या वतीने पत्रकारांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीचे अमोल शेलार, दीपक पाटील आदी यांचे सहकार्य लाभले ........ हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी   उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा   विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी  व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments