टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ याच वर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. यापूर्वी खेळवली जाणारी टीम इंडियाची ही शेवटची टी20 सीरिज असणार आहे. टीम इंडियानं अफगाणिस्तानविरोधातले दोन सामने जिंकून आधीच मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियानं मालिका जिंकल्यातच जमा आहे. पण आजचा शेवटचा सामनाही टीम इंडियानं खिशात घातला तर मात्र अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे.
टीम इंडिया विरोधात अफगाणिस्तानची ऐतिहासिक सीरिज आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सीरिज खेळवण्यात आली आहे. 2018 मध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात आली होती. तेव्हा द्विपक्षीय सीरिजमध्ये केवळ एकच टेस्ट मॅच खेळवण्यात आली होती. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघानं 262 धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता.
0 Comments