ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "मी सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. कारण मला हे अपेक्षित होतं. ज्या दिवशी मला ACB कडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं, त्याचदिवशी मला माहीत होतं, ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्की पोहोचणार, त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं. तसेच, त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे."
मला अटक झाली तरी चालेल, मला चिंता नाही : राजन साळवी
मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही आणि मी राजन साळवी काय आहे, हे मला स्वतःला माहिती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, याचे परिणाम काहीही होऊ देत, सामोरं जाण्याची तयारी आहे, असंही ते म्हणाले आहेत.
0 Comments