पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
जिल्हात किमान तापमानात घसरण होत असल्याने शहर आणि परिसरातील किमान चार भागात 16 जानेवारी रोजी 9 अंश सेल्सिअसच्या जवळपास एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. पाषाण येथे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एनडीए 9.3 अंश सेल्सिअस, शिरूर 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी पाषाण येथे 9.7 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी शिवाजीनगर येथे 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान होते. पुणे जिल्ह्यात या आठवड्यात आकाश निरभ्र असल्याने या कालावधीत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, अशी माहिती पुणे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.
0 Comments