news-details
तंत्रज्ञान

राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला प्रभू श्रीरामाचा अर्थ

 राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Ayodhya) यांनी म्हटले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर  पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला अर्थ

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, या काळात अयोध्या आणि देशवासीयांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला.आपल्या अनेक पिढ्यांनी हे  सहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, राम म्हणजे आग नाही तर ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, तर तोडगा आहे असेही त्यांनी म्हटले. राम वर्तमान नसून शाश्वत, अनंत आहे. राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा आधार आहे, राम हा भारताचा विचार आहे, राम हा भारताचा विचार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राम हे भारताचे जीवन आहे. राम महान आहे, राम प्रभाव आहे, राम प्रवाह आहे, राम धोरण आहे, राम सातत्य आहे, राम निरंतरता आहे, राम सर्वव्यापी आहे, जग, विश्व-आत्मा आहे, जेव्हा राम पूज्य होतो, त्याची प्रतिष्ठापना होते तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकतो. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभे राहणारे राष्ट्र नवा इतिहास घडवत असल्याचे  पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’

अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधीवत पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह दिसून आला. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. सगळी अयोध्यानगरी राममय झाली. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्मित राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’ केला.

 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments