news-details
देश-विदेश

मनोज जरांगेंचा मोर्चा पुण्यातील 'या' मार्गांवरुन जाणार; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांमध्ये बदल

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा करत मोर्चा काढला आहे. बीडमधून मोर्चाला सुरूवात झाली असून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. पुण्यातून या मोर्चाचा मार्ग असू आज दुपारी पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत मनोज जरांगे पाटील प्रवेश करत आहेत.

मनोज जरांगेंच्या पदयात्रेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे.

प्रवेश मार्ग

१ ) स्व. राजीव गांधी पुल औंध पुणे

२ ) सांगवी फाटा

३) जगताप डेअरी

४ ) डांगे चौक

५ ) चापेकर चौक चिंचवडगाव

६ ) महावीर चौक चिंचवड स्टेशन

७) आकुर्डी खंडोबा माळ चौक

८ ) निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल

९ ) भक्ती शक्ती चौक निगडी

१० ) देहूरोड

११) तळेगाव

१२) वडगाव फाटा मावळ

१३) कामशेत

१४) लोणावळा मुक्काम

पर्यायी मार्ग

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला - न्हावरे- शिरूरमार्गे जातील.

तर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरामार्गे शिरूर ते अहमदनगर जातील. यासह पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला - न्हावरे -शिरूरमार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments