news-details
आरोग्य

देशातील कोरोना बाधितांची मोठी घट, 50 हजारांहून अधिक रुग्ण कमी, गेल्या दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 रुग्ण

Coronavirus Cases in India Today : देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना (Corona) रुग्णवाढीत घट पाहायला मिळत आहे. त्यातच मागील 24 तासात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमालीची कमी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात  2 लाख 55 हजार 874 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख सलग चौथ्या दिवशी घसरताना पाहायला मिळतोय. यापूर्वी, सोमवारी कोरोनाचे 3 लाख 6 हजार 64 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या 3 कोटी 95 लाख 43 हजार 328 वर पोहोचली होती.

देशातील संक्रमित लोकांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments