मुंबई : सध्या भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट २१ डिसेंबर पासून सुरु झाली होती.रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यात भारताला यश आले होते. परंतु पुढील दोनचार आठवड्यात कोरोना मृत्यूदर वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. मृत्यूदाराची तुलना केल्यास पहिल्या एकदोन आठवड्यांपेक्षा तिसऱ्या आठवड्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.गेल्या आठवड्यात राज्यभरात मुंबईत ७९ तर राज्यात ३०३ मृत्यूची नोंद झाली.मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे राज्य मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉक्टर अविनाश सुपे यांनी सांगितले आहे.
0 Comments