मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. दुसरीकडे देशमुख यांनी आता नियमित जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
0 Comments