news-details
व्यापार

शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. एकीकडे अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेअर बाजाराकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत होताना दिसत आहे. शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी पाहायला मिळाली आहे.

सध्या सेन्सेक्स ९१४ अंकांच्या उसळीसह ५९ हजार अंकांच्या जवळपास आहे. तर निफ्टीने देखील २०० अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. र्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान सन फार्मा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये चांगला खरेदीचा कल दिसून आला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments