पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २०२२च्या अर्थसंकल्पावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. देश १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. करोनाच्या या काळात जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. आपण पुढे जे जग पाहणार आहोत ते करोनापूर्वीचे जग राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“करोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. याची चिन्हेही दिसू लागली आहेत. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगभरातील लोकांना भारताला अधिक मजबूत रूपात पहायचे आहे, त्यामुळे जेव्हा संपूर्ण जग भारताकडे नव्याने पाहत आहे, तेव्हा आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्यक आहे. नवीन संधी आणि नवीन संकल्प पूर्ण करण्याची ही वेळ आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
0 Comments