देशातल्या करोना रुग्णसंख्येत काल दिवसभरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन नव्या करोनाबाधितांची संख्या ६.८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की आज सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या दोन लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यासोबतच उपचाराधीन रुग्णसंख्याही एक लाखांच्या खाली आहे. मात्र केरळमधली रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
0 Comments