भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली. तर स्मारकावरून राजकारण करू नका, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. यानंतर आता मनसेकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका अशी विनंतीच केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती”.
0 Comments