news-details
इतर

अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी मराक्का हे प्रभावी विचारपीठ - डॉ.सादिक पटेल

अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी मराक्का अर्थात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन हे प्रभावी विचारपीठ आहे, असे प्रतिपादन जे.जे. रुग्णालयाचे गुणश्री प्राध्यापक व माजी विभाग प्रमुख डॉ.सादिक पटेल यांनी केले. मुंबई येथील जे.जे.रुग्णालय हॉलमध्ये मराक्का तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ईद-ए-मिलन व कार्यगौरव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी डॉ.नागसेन रामराजे साहेब (माजी अधिष्ठाता,धुळे वैद्यकिय महाविद्यालय व माजी विभाग प्रमुख, जे.जे.रुग्णालय) डॉ. मकसूद खान साहेब (माजी सी. ई. ओ.हज कमिटी ऑफ इंडिया) यांच्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

     यावेळी मा.नसीमा शेख (माजी सह सचिव, मंत्रालय) शौकत अली शेख (अप्पर राज्यकर आयुक्त) डॉ.डेव्हिड अल्वारीस (राज्यकर सह आयुक्त), नसीर कादरी (संचालक, महापारेषण) फैय्याज खान (महाव्यवस्थापक, गृहनिर्माण, सिडको) डॉ.आकाश खोब्रागडे (अधीक्षक, सेंट जॉर्ज हॉस्पिटल) प्रा.जावेद पाशा (विचारवंत) श्रीमती नेहा गोडघटे (कवयित्री) आदी मान्यवर उपस्थित होते.

     असोसिएशनचे अध्यक्ष श्री.हाजी जतकर (राज्यकर उपायुक्त,वरीष्ठ श्रेणी) यांनी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर असोसिएशनची स्थापना झाल्याचे सांगून राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणे व मानवी मूल्यांचे संवर्धन करणे हा असोसिएशनचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. असोसिएशनच्या आजपर्यंतचा कार्याचा आढावा त्यांनी घेतला व असोसिएशन मध्ये जास्तीत जास्त आधिकरी कर्मचारी सामील होऊन स्वतःचे व समाजाचे सक्षमीकरण कसे होईल हा ध्यास उराशी बाळगून राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हा व  अन्यायाविरुध्द लढून डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष शौकत अली शेख यांनी संघटनेमध्ये काम केल्यास संरक्षण व आत्मविश्वास मिळतो त्यामुळे असोसिएशनचे महत्व अबाधित राहते असे सांगितले.

     या कार्यक्रमामध्ये श्री. लालमिया शेख साहेब यांची मौलाना आझाद महामंडळावर  कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्याने व कुमारी ॲलिस  अल्वारीस हिने सी.एस.(कंपनी सेक्रेटरी) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने विशेष सत्कार करण्यात आला.

     या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त झालेले इजाजुल्ला खान,(शिक्षणाधिकारी, अमरावती) नासीर बिराजदार, (कार्यकारी अभियंता,जलसंपदा, पुणे) मजीद शेख, (प्राध्यापक,रायगड) अक्रमुद्दिन मुलाणी, (कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई) अजमात पाशा गढवाल, (कक्ष अधिकारी, पुणे) अजीम मुल्ला, (मुख्याध्यापक, रायगड) यांचा सत्कार करणेत आला.

     पदोन्नती मिळालेल्या अधिकारी कर्मचारी यामध्ये सैफुन शेख, (उपवनसंरक्षक, पनवेल) मोहसीन बागवान , (कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई) अनिस पिंजारी, (वरीष्ठ सहायक, नंदुरबार) असिफ सय्यद, (कर निरीक्षक) श्रीमती अफ्रीन कुरेशी, (कर निरीक्षक) यांचा सत्कार करणेत आला.

     देशाप्रती व समाजाप्रती उत्कृष्टरित्या  काम केलेल्यामध्ये जानमोहमद पठाण,माजी पोलिस आयुक्त, पुणे  (छ.शिवाजी महाराजांचा पुतळा  तैवांग, हिमाचल प्रदेश येथे स्थानापन्न केला ), प्रा.डॉ.शाफियोदीन सय्यद, संशोधक, बीड ( चांद्रयान मोहीम यशस्वी होणेसाठी प्रयत्न) प्रा.डॉ.मुस्तफा सय्यद,औरंगाबाद (पेटंट संशोधन), इम्तियाज शेख,पुणे (सामाजिक कार्य) यांचा सत्कार करणेत आला.

     नवनियुक्त अधिकाऱ्यांमध्ये श्रीमती वसीमा शेख (उप जिल्हाधिकारी), श्रीमती आसमा सय्यद  (सहायक राज्यकर आयुक्त), श्रीमती समीना बागवान (उप अधीक्षक, भूमी अभिलेख), फैय्याज शेख (उप अधीक्षक, भूमी अभिलेख), वसीम शेख (पोलिस उप निरीक्षक ) यांचा सत्कार करणेत आला. कार्यक्रमासाठी राज्यातून  १७५ मान्यवर, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

     कार्यक्रम यशस्वी होणेसाठी मोहम्मद युसुफ निशाणदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), लालमिया शेख, कार्यकारी संचालक,मौलाना आझाद महामंडळ (सह खजिनदार), नजीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस), यासीन मापारा, कार्यकारी अभियंता,सिडको (चिटणीस), सूहेल खान, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिनदार), दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो (खजिनदार), असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्रीमती यास्मिन शेख, कामगार अधिकारी (सदस्या) , नासीर शेख, निरीक्षक बी.एम.सी (सदस्य), मोहम्मद आरीफ,राज्यकर निरीक्षक (सदस्य), लियाकत शेख,राज्यकर निरीक्षक (सदस्य), असिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), सरोश भुरे, मुख्याध्यापक (सदस्य), काय्युम दाखवे, मुख्याध्यापक (सह खजिनदार), मोहंमद आरीफ, कर निरीक्षक (सदस्य), फारुख खाटीक, पदवीधर शिक्षक (सदस्य), अखलाख शेख, पदवीधर शिक्षक (सदस्य), अंजुम पोवाला, पदवीधर शिक्षक, हसन खान, लिपिक, बी. एम.सी., मोहमद जतकर, कर सहायक यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासीर खान,निरीक्षक बी एम सी. व फारुक खाटीक यांनी केले. आभार प्रदर्शन नजीर शेख (राज्यकर उपायुक्त) यांनी केले.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments