news-details
क्रीडा

शेवटच्या दोन चेंडूत सामना फिरला, गुजरातकडून पंजाबचा आश्चर्यकारक पराभव

IPL 2022  यंदाच्या हंगामातील १६ वा सामना गुजरात आणि पंजाबमध्ये (PBKS vs GT) खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेरच्या दोन चेंडूंमध्ये फिरला. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना राहुल तेवतियाने अनपेक्षितपणे सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकला. सामना हातातून गेला असं समजून बसलेले गुजरातचे चाहते आणि सामना जिंकला असा विश्वास बसलेल्या पंजाबचे चाहते अशा दोन्ही चाहत्यांना हे दोन षटकार धक्का देऊन गेले. अत्यंत आश्चर्याकारकपणे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments