पाटीलनगर, चिखली येथील अंगणवाडीची अवस्था खूप दयनीय झाली होती. तसेच काही प्रमाणात पडझड झाली होती. काही वर्षांपुर्वी तिथे अंगणवाडी चालू होती. पण कालांतराने त्याच अंगणवाडीची पडझड होयला सुरुवात झाली. पत्र्यांमधून पाणी गळू लागले, फरश्या फुटून गेल्या. कालांतराने ती अंगणवाडी लहान मुलांसाठी बंद करण्यात आली. अंगणवाडी बंद राहिल्याने तिची खुपच पडझड झाली होती.
अंगणवाडीची झालेली हि अवस्था पाटीलनगरला आता येता आमच्या लक्षात आली व ही अंगणवाडी दुरुस्त व्हावी अशी संक्लपना मनात आली व त्यानुसार अंगवणवाडी दुरुस्तीचे काम सुरु झाले व पाहता पाहता ते पूर्णही झाले.
१ मे पासून तिथे लहान मुलांसाठी अंगणवाडी चालू झाली आहे.
अंगणवाडी स्वखर्चातुन दुरुस्त करून दिल्याबद्दल शिक्षकांनी व पालकांनी जितुभाऊ यादव युवा मंचाचे आभार मानले.
0 Comments